शिक्षकाने केला चिमुरडीवर अत्याचार
त्या नराधम शिक्षकाला फाशी द्या- सौ. माधवीताई पोतदार
शिक्षकी पेशाला काळीमा- विरभद्र पोतदार( संपादक )
संपादकीय-
सोलापूर- बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील बालवाडीच्या एका शाळेतील साडेपाच वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
या घटने प्रकरणी मुलीच्या पालकांच्या तक्रारी वरुन गुरुवारी शिक्षक राहुल अंबादास वायखिंडे रा.माजलगाव याच्या विरोधात लैंगिक अत्याचार केल्याची गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
त्यानंतर घटनेची गांभीर्य ओळखून उपविभागीय अधिकारी धीरजकुमार बच्चु व पो. नि.राहुल सुर्यतळ यांचे सह पो.उप.नि. सुनील दिंडे यांनी सदरील शाळेची संपुर्ण चौकशी करुन तेथील सीसीटिव्ही तपासणी करून शाळेतील सर्व शिक्षकांची ओळख परेड घेतली.
त्यानंतर सर्व शिक्षकांची फोटो मधुन सदरील आरोपीस चिमुरडीने ओळख धरली व पोलिसांनी संबंधित शिक्षक राहुल अंबादास वायखिंडे यास अटक करण्यात आली.
-------------------------------------------------------
त्या नराधम शिक्षकाला फाशी द्या- सौ. माधवीताई पोतदार
माजलगाव शाळेतील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्या नराधम शिक्षक राहुल वायखिंडेला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आजवर अशा घटना वाढतच असुन या प्रकरणास फास्ट ट्रॅक कोर्टात केस दाखल करुन लवकरात लवकर या नराधमास मरेपर्यंत फाशीची शिक्षा देण्यात यावी,तसेच पिडित मुलीस व तिच्या परिवास न्याय मिळवून द्यावी म्हणून ओबीसी हक्क परिषद दिल्ली महिला प्रदेश अध्यक्षा सौ. माधवीताई पोतदार यांनी सोलापूर जिल्हाधिकारी यांना निवेदनात म्हंटले आहे.
तसेच लैंगिक अत्याचार विरोधात कायद्यात बदल व्हावे व पुन्हा अशी गुन्हा करण्याची कोणाची हिम्मत होऊ नये म्हणून लवकरात लवकर या प्रकरणाचा निकाल न लागल्यास तीव्र आंदोलन
करण्याचा इशारा देखील केले आहे. सदरील अल्पवयीन मुली ओबीसी तील सोनार समाजाची आहे सोनार समाज कडुन तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
यावेळी पश्चिम महिला अध्यक्षा सौ. माधुरी डहाळे, सोलापूर जि.म.अध्यक्षा सौ. मनिषा पंडित, सोलापूर शहराध्यक्ष प्रकाश कटारे, जि. सचिव संतोष सुतार, महाराष्ट्र प्रदेश संघटक काशीनाथ पोतदार आदी उपस्थित होते.
-------------------------------------------------------
शिक्षकी पेशाला काळीमा- विरभद्र पोतदार (संपादक)
शिक्षक हा ज्ञान देणारा गुरु म्हणून ओळखला जातो . "गुरुर्ब्रम्हा, गुरुर्विष्णु, गुरुर्देवो, महेश्वरा, गुरुर्साक्षात, परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम:" तर या मंत्रांचा अवहेलना होत आहे.
शिक्षक आणि विद्यार्थींच नातं हे पवित्र असतं, आपल्या विद्यार्थ्यांना चांगला घडविण्यासाठी शिक्षक प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. मात्र याच पवित्र नात्याला काळीमा फासत शिक्षकाने त्यांच्या मुली समान अल्पवयीन मुलीवर अत्याचार करतात म्हणजे खरंच शिक्षकी पेशाला काळीमा लागल्यागत आहे. कित्येक शाळांमध्ये असुरक्षिततेची वातावरण पाहायला मिळते त्यामुळे पालक वर्गात भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. आणि ज्या शिक्षकांच्या भरवशावर पालक आपल्या मुलींना शाळेत पाठवतात तेच शिक्षक असे कृत्य करत असतील तर कसे होणार!
पोलिसांनी त्या नराधमास भारतीय दंड संहितेच्या जास्तीतजास्त कलम व अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम लावुन त्या शिक्षकाला मरण दंडाचीच शिक्षा द्यावी तरच शिक्षकी पेशाला लागलेली काळीमा पुसली जाईल आणि विद्यार्थी शिक्षकांची नातं नव्याने निर्माण होईल.