**** रतन टाटा ***
बागलकोट प्रतिनिधी/ लेखिका- सौ. सुधा बेटगेरी
'रतन नवल टाटा' भारताचे एक अद्वितीय प्रेरणादायक उद्योगपती होते. आज 9ऑक्टोबर 2024 रोजी रतन टाटा या नावाच्या 'धरतीवरील सूर्याचा अस्त ' झाला आहे. आज भारताने आपला बहुमूल्य ' कोहिनूर ' हरवला आहे.
टाटा हे फक्त नाव नव्हते, ही एक क्रांती होती; उद्योग युगाची प्रथम सुरुवात आणि भारताच्या प्रगतीची पहिली सुरुवात होती. भारतात इंडस्ट्रीची पहिली क्रांती जमशेदजी टाटा यांनी 1861 साली सुरू केली होती. 1861 मध्ये भारतात प्रथम कॉटन टेक्स्टाईल मिलची सुरुवात झाली आणि तेव्हापासूनच भारतात एका मॉडर्न इंडस्ट्रीयल युगाची सुरुवात झाली.
1861 ते 1904 या कालावधीत जमशेदजी टाटा यांनी टेक्स्टाईल, हायड्रोपॉवर आणि अनेक इतर उद्योगांची स्थापना केली. ' टाटा महल पॅलेस हॉटेल ' ची सुरुवातही जमशेदजी टाटा यांनी केली.
पुढे, 1904 ते 1932 या कालावधीत टाटा ग्रुपचा भार दोराजी टाटा यांनी सांभाळला, ज्यांनी टाटा स्टील, टाटा पॉवर, टाटा केमिकल्स, आणि टाटा एअरलाईन्स सारख्या अनेक उद्योगांमध्ये टाटा समूहाचा कारभार पसरवला.
1938 ते 1991 या कालावधीत जे आर डी टाटा यांनी टाटा ग्रुपचा भार सांभाळला, आणि त्यांनी एव्हिएशन, ऑटोमोबाईल, स्टील, आणि आय टी सारख्या अनेक उद्योगांमध्ये टाटा समूहाचे नाव उज्वल केले. टाटा टी ची सुरुवातही जे आर डी टाटा यांनीच केली होती.
1991 ते 2012 या कालावधीत रतन टाटा यांनी टाटा ग्रुपची कमान सांभाळली. जनसामान्यांचे ' कार ' चे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांनी टाटा नॅनो ची सुरुवात केली. पुढे, टाटा मोटर्स, टीसीएस, अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी टाटाचे नाव उज्वल केले.
रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 मध्ये झाला. त्यांनी टाटा समूहाला औद्योगिक क्षेत्राच्या शिखरावर पोहोचवण्याची महत्त्वाची जबाबदारी घेतली. स्टील, ऑटोमोबाईल, आय टी, टेलिकम्युनिकेशन यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये टाटांनी आपला कारभार पसरवला.
रतन टाटा यांनी फक्त इंडस्ट्रीज क्षेत्रातच नव्हे तर शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातही अद्वितीय काम केले आहे. ग्रामीण विकासासाठी टाटा ट्रस्टने केलेले काम हे अस्मरणीय आहे. रतन टाटा विशेषतः प्राणी प्रेमी ही होते.
टाटा समूहात सुमारे 8 लाख कर्मचारी विविध क्षेत्रांमध्ये काम करत आहेत, एवढ्या सगळ्यांना उद्योग देणारी ही भारतातील एक अत्यंत मोठी कंपनी आहे. भारताच्या प्रगतीमध्ये' टाटा' हे नाव अस्मरणीय आहे.
रतन टाटा यांच्या मृत्यूमुळे आज भारताला खूप मोठे नुकसान झाले आहे, परंतु त्यांचे नाव आज घरोघरी टाटा टी, टाटा सॉल्ट, टाटा मोटर्स, यासारख्या रूपाने सदैव अजरामर राहील.
*****************************