Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

मतदान केंद्राच्या 100 मीटरच्या आत मोबाईल नेण्यास बंदी

Responsive Ad Here

 मतदान दिवशी मतदार किंवा अन्य व्यक्ती मतदान केंद्राच्या 100 मीटरच्या आत मोबाईल नेण्यास बंदी 



मतदान केंद्राच्या 100 मीटरच्या आत मोबाईल नेण्यास  बंदी 






पुणे -  मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आवारात कोणताही मोबाईल, स्मार्टवॉच, पेन कॅमेरा आदी इलेक्ट्रॉनिक उपकरणे घेऊन येण्यास पूर्णत: बंदी आहे,

 अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली.


मतदान केंद्रात आणि केंद्राच्या १०० मीटरच्या आवारात मतदान केंद्र अध्यक्ष, सूक्ष्म निरीक्षक सोडून निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी, कर्मचारी, उमेदवार, उमेदवाराचे मतदान प्रतिनिधी, मतदार, वार्ताहर आदी कोणाही व्यक्तीला कोणताही मोबाईल, स्मार्टवॉच, पेन कॅमेरा, वायरलेट सेट यासह इलेक्ट्रॉनिक उपकरणे घेऊन येण्यास बंदी आहे. 


अनवधानाने आणल्यास मतदान केंद्राच्या १०० मिटरच्या अंतरावर ठेवावा लागेल. 


मतदान केंद्रावर किंवा मतमोजणी केंद्रावर मोबाईल सापडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याबाबत सर्व उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी व नागरिकांनी सहकार्य करावे, 

असेही ते म्‍हणाले.


व्हि.डी.ओ., फोटो काढून प्रसारित केल्यास कठोर कारवाई केली जाईल.


निवडणूक कामकाजाची छायाचित्रे काढणे किंवा चित्रीकरण करणे, 

त्यांचे तसेच निवडणूकविषयक अफवा पसरविणारे संदेशाचे व्हॉटस्अॅप ग्रुप, समाजमाध्यमांवर प्रसारण करणे हा गंभीर गुन्हा आहे, असे करणाऱ्यावर गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी दिला आहे.