आई-वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी तरुण पिढी ही संस्कारक्षम घडवणे काळाची गरज.. ..अदृश्य काड सिद्धेश्वर स्वामीजी..
इस्लामपूर/ प्रतिनिधी-
इस्लामपूर येथील डॉ. बाबुराव घोडके फाउंडेशन च्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे वेळी कणेरी मठाचे मठाधिपती काड सिद्धेश्वर स्वामीजी बोलत होते.
यावेळी बोलताना काड सिद्धेश्वर स्वामी पुढे म्हणाले की, चांगल्या माणसांचा सहवास लाभतो तेव्हा चांगले विचार भेटतात. चांगल्या माणसांची ओळख ही त्यांच्या सत्कार्यातून होत असते .मुलांना लहानपणी उत्तम संस्कार दिले तर जीवनाचे सार्थक होते .आई-वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी उत्तम पिढी घडवणे हे महत्त्वाचे आहे. त्यासाठी मातृ, पितृ ,गुरु, आणि समाजऋण फेडण्याची गरज आहे आज लोकांना आई-वडील सांभाळता येत नाही . त्यामुळे दिवसेंदिवस वृद्धाश्रमाची संख्या वाढत आहे ही समाजाला भूषणावह नक्कीच नाही. समाजमन आणि समाज स्वास्थ टिकवायचे असेल तर बालकांना लहानपणापासूनच उत्तम संस्कार देणे याला पर्याय नाही. ते कार्य गेली अनेक वर्ष डॉ. बाबुराव घोडके फाउंडेशनचे प्रा.अरुण घोडके करतायेत याचा आम्हाला अभिमान वाटतो..
यावेळी स्वामीजींच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार डॉ. सचिन पाटील डॉ. माणिक हिरवे ,श्री अभय तोडकर प्रा. डॉ. धनंजय ठोंबरे आणि पणन चे सर व्यवस्थापक,सुभाष घुले यांना प्रदान करण्यात आला. तसेच रयतधारा प्रेरणा पुरस्कार अँड. अनिता दिवटे, इंजि.सानिका माळी आणि डॉ.आदिती घोडके यांना देण्यात आला. यावेळी डॉ. धनंजय ठोंबरे, पणन चे सरव्यवस्थापक सुभाष घुले, डॉ. माणिक हिरवे, डॉ. सचिन पाटील,अभय तोडकर, अनिता दिवटे या सत्कारमूर्तींनी आपली मनोगत व्यक्त केली.
आजवर डॉ. बाबुराव घोडके फाउंडेशन च्या वतीने 31 मान्यवरांना राज्य पुरस्कार देण्यात आले आहेत.
स्वागत इंजि. गणेश पाटील, प्रास्ताविक प्रा. डॉ. दीपक स्वामी तर आभार अमेय घोडके यांनी मानले.
यावेळी महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम, उद्योगपती भरतेश गांधी, थोर विचारवंत श्रीधर साळुंखे,विश्वासराव पाटील, कुंडलिक एडके, बबनराव रानगे,प्रा .डॉ. अरुण घोडके यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बजरंग गावडे यांनी केले .
खोची (जि. कोल्हापूर) येथील रोहित डवरी आणि नाथपंथीय डवरी समाज पारंपारिक भक्ती गीते मंडळाचा सत्कार स्वामीजींच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे संयोजन विलासराव कोळेकर,डॉ . योगेश वाठारकर,इंजि . दत्तात्रय माने,सर्जेराव टकले, बजरंग कदम,संतोष भिसे,विनायक माळी, श्रीधर विरकर, सुनील मलगुंडे , सुधीर बंडगर,विनायक सिद, अजित येडगे, अतुल दिवटे, अक्षय यमगर,आदित्य घोडके यांनी केले.