मतदार जागृती करिता अक्कलकोट स्वराज्य माहिती अधिकार संघटनेचा अनोखा फंडा
अक्कलकोट/ प्रतिनिधी -
अक्कलकोट विधान सभेच्या पंचवार्षिक निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढावा व मतदानाचे महत्व पटवून देण्याकरिता स्वराज्य पोलिस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना अक्कलकोट शाखेने शहराच्या प्रमुख सात चौकात स्वः खर्चाने डिजीटल बॅनर बसवून एक अनोखा फंडा केला आहे. या विधानसभा निवडणूकीत सर्वच मतदारानी आपला अमुल्य मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन स्वराज्यचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत दादा वेदपाठक यांनी केले आहे.
अक्कलकोट शहरातील एस.टी. स्टँड, कांरजा चौक, सावरकर चौक, राजे फतेसिंह चौक, एवन चौक, मंगरुळे हायस्कूल जवळील बायपास चौक, व जेऊर रोड चौक अश्या सात ठिकाणी अक्कलकोट नगरपालिकेचे रितसर परवाना मिळवून भव्य डिजीटल बॅनर बसवून 90% मतदान करण्याचा आग्रह धरला आहे, या मतदार जन जागृतीच्या अनोख्या फंडाने सर्वत्र एकच चर्चा चालू आहे.
स्वराज्य पोलिस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष दिपकजी कांबळे, राष्ट्रीय संस्थापक महासचिव कमलेशजी शेवाळे देवासर, प्रदेश अध्यक्ष सौ. धनश्री उत्पात यांचे आदेशानुसार व विश्वस्त तथा राज्य प्रसिद्धी प्रमुख उमेशजी काशिकर व सोलापूर जिल्हा अध्यक्ष दिनेशजी काटकर यांचे मार्गदर्शना खाली मतदार जनजागृती अभियान अंतर्गत हा उपक्रम अक्कलकोट शहरात राबविण्यात आला आहे.
सदर उपक्रम राबविण्या करिता स्वराज्य चे उपाध्यक्ष दीपक पोतदार, उपाध्यक्ष गौरीशंकर चनशेट्टी, कार्याध्यक्ष दयानंद बिडवे, सेक्रेटरी . सौ. वर्षाताई चव्हाण, सदस्य काशिनाथ पोतदार , पंकज कोरेकर, बलभिम पवार, शिवलिंगपा संगापुरे, अप्पासाहेब
धुमाळ, श्रीमती मिराबाई बुद्रुक आदीनी विषेश परिश्रम घेतले.