Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तहसील प्रशासन सज्ज

Responsive Ad Here

 विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तहसील प्रशासन सज्ज






   अक्कलकोट / प्रतिनिधी- प्रविणकुमार बाबर 

राज्यासह तालुक्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकी करिता अक्कलकोट तहसील प्रशासन जोरदार तयारी सुरु केली असून, काल CU, BU, VVPAT पेरिंग करण्याचे काम संपवले असून, आज पासून, मतदानासाठी ईव्हीएम मशीन तपासणी करून सील बंद करण्याचे सुरु होणार आहे. 

         अक्कलकोट विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने एम -3बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व व्हीव्हीपॅड, मशीन वापर यासंदर्भात केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचा प्रशिक्षणाचा पहिला व दुसरा टप्पा पूर्ण झाला असून, यात एकूण 1810 अधिकाऱ्यांनी भाग घेतले होते. 

           निवडणुकीतील नवीन कायदे, तरतुदी व अध्यावत सूचना, पोस्टल मतदान, व निवडणूक कार्य प्रमाणपत्र, मशीन सिलिंग, व व्हीव्हीपॅड ची डूज अँड डोन्ट्स, संकलन केंद्र, मतदान पूर्व, मतदान दरम्यान, मतदान समाप्तीवेळी करावयाची कामे आदीबाबत माहिती देण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत बनसोडे व सहायक निवडणूक अधिकारी तहसीलदार विनायक मगर, नायब तहसीलदार विकास पवार, विजयकुमार गायकवाड, संजय भंडारे, उपस्थित होते.

     तसेच निवडणूक शाखेत मतदान याद्या बाणफुली शिक्का, तसेच साहित्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून, मतदार व मतदानाकरिता लागणाऱ्या सर्व बाबी ह्या निवडणूक शाखेतून जवळपास पूर्ण झाले असून, याकरिता निवडणुक नायब तहसीलदार विजयकुमार गायकवाड, महसूल सहायक श्रीमंत सारणे, अशी माहिती यांनी दिली.





         अक्कलकोट विधानसभा क्षेत्रात 3 लाख 83 हजार 479 मतदार असून त्यात पुरुष मतदार 1 लाख 96 हजार 577 तर 1 लाख 86 हजार 859 स्त्री मतदार असून, सैनिक मतदार 434 असून, पुरुष 425, स्त्री 9 असे आहे. अक्कलकोट शहर व ग्रामीण मतदान केंद्र 305 व दक्षिण सोलापूर मधील अक्कलकोट विधासनभा परीक्षेत्रात येणारे मतदार संघ 91 असे एकूण 396 एवढे मतदान केंद्र करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत बनसोडे यांनी दिली.

       निवडणूक निर्णय अधिकारी विधानसभा मतदार संघ यांचे कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून मतदान टक्केवारी वाढविण्या साठी मतदान वाढावे यासाठी मतदार जनजागृती करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मतदान केंद्रावर मतदारांकरिता आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांना मतदानाचा हक्क बजावणे सुलभ व्हावे याकरिता घरोघरी मतदानची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आपल्या घरातील लग्न समारंभ वा सणांप्रमाणे हा लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत बनसोडे व सहायक निवडणूक अधिकारी तहसीलदार विनायक मगर यांनी केले.