Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

निवडणुकीच्या कामकाजात महसूल सेवक अव्वल

Responsive Ad Here

  निवडणुकीच्या कामकाजात महसूल सेवक अव्वल






अक्कलकोट/प्रतिनिधी- प्रविणकुमार बाबर 

            राष्ट्रीय निवडणुक आयोगाने निवडणुका घोषित करताच राज्यसह अक्कलकोट तहसील प्रशासनाने जोरदार तयारी सुरु केली असून त्याच पार्श्वभूमीवर महसूल विभागाचे कान, नाक, डोळे, समजले जाणारे महसूल सेवक हे हिरहिरीने निवडणुकीचे काम करताना पाहायला मिळतात. अक्कलकोट चे तहसीलदार विनायक मगर यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्राम महसूल अधिकारी, महसूल सहायक, यांच्या समवेत हाती पडेल ते काम हे महसूल सेवक पूर्ण करण्याचे काम करतात. शिवाय महसूल सेवक हा निवडणुकीच्या कामकाजात अतिशय तरबेज असून, CU, BU, VVPAT पेरिंग करणे, एम -3बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व व्हीव्हीपॅड, मशीन वापर,निवडणुकीतील नवीन कायदे, तरतुदी व अध्यावत सूचना, पोस्टल मतदान, व निवडणूक कार्य प्रमाणपत्र, मशीन सिलिंग, व व्हीव्हीपॅड ची डूज अँड डोन्ट्स, संकलन केंद्र, स्ट्रॉंग रूम मधून पेट्या बाहेर काढणे, ठेवणे,  मतदान पूर्व, मतदान दरम्यान, मतदान समाप्तीवेळी करावयाची कामे 

,मतदान याद्या बाणफुली शिक्का, तसेच साहित्याचे काम, मतदार व मतदानाकरिता लागणाऱ्या सर्व बाबी ह्या त्यांना नेहमीच्या असल्याने त्यांना निवडणूकिचे कामकाज करणे अगदी सोयीचे ठरत असताना पाहायला मिळत आहे. 

          विधानसभा निवडणुकीच्या कामकाजात तालुका अध्यक्ष शपीक वाडीकर जिल्हाध्यक्ष विठ्ठल गुरव, रेवण सुतार, प्रविणकुमार बाबर,शिवानंद कोळी सुनील मुलगे, दीपक कांबळे सोमनाथ आलुरे , जाकीर कागदे, वीरभद्र आकाश घंटे स्वामी, दत्ता कोळी, फिरोज तांबोळी ,हनुमंत सानप, सैपन पठाण,स्वामीनाथ जमादार  महादेव, अर्जुन सनके, जगदीश देसाई, चांगदेव चव्हाण,चंद्रकांत तळवार, सुचिता काळे,अनिल जमादार,प्रवीण गुंजले, सूर्यकांत रामपुरे, ममता कोळी, श्रीमंत कोळी, मल्लिनाथ कळशेट्टी, सोमनाथ जमादार, काशिनाथ माने, चौडप्पा कुंभार, राजेंद्र पाटील, रेणुका कुंभार, बाबू कोरबू, शिवशरण कोळी, यांच्यासह तालुक्यातील 52 महसूल सेवकांचे कामकाज युद्धपातळीवर सुरु आहे.