Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

दुधनीतील अवैद्य रेशन तांदुळाची तस्करी कोण रोखणार ?

Responsive Ad Here

 दुधनीतील अवैद्य रेशन तांदुळाची तस्करी कोण रोखणार ?


भावी आमदार याची दखल घेतील का?






अक्कलकोट- तालुक्यातील दुधनी शहर सीमा भागात असल्याने मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु असताना पाहायला मिळतात. त्यातच कर्नाटकसह तालुक्यातील बहुतांश गावातुन रेशन तांदुळाची आयात दुधनी शहरात मोठ्या प्रमाणात होत आहे.

    दुधनीमध्ये अवैध  रेशन तांदळासह, मटका,

पर राज्यातील दारू, जुगार इ.जोमाने चालत असतात, ह्या धंद्यात मोठी कमाई असल्याने " उठ चंदा फिर वही दो नंबर धंदा " जोरदार सुरू असल्याची चर्चा आहे. 

    दुधनी शहर हे पुर्वी पासून पान दुधनी म्हणून ओळखले जात असे, आता मात्र मटका व तांदूळ दुधनी म्हणून ओळखले जात आहे.

    विधानसभेच्या निवडणुकीत सर्व उमेदवारांनी मागील विकास कामाबद्दल सांगितले, कवडी मात्र अवैध धंदे बद्दल एक शब्द ही काढले नाहीत. असे तर नाही ना या प्रकरणात " तेरी भी चुप मेरी भी चुप " असेही जनतेकडून बोलले जात आहे. 

      अनेक वर्षांपासून चर्चा मात्र सुरु आहे की दुधनी शहरात अवैध रित्या तांदळाची तस्करी होते आहे आणि आमदार, खासदार पासुन ते प्रशासन पर्यंतचे लोक अवैध धंदे करणार्यांना सतर्क केले जाते असेही जनतेकडून बोलले जात आहे. 

    गरीब कुटुंबातील महिला व पुरुष म्हणतात की माझा नवरा, माझा मुलगा रोज दारु पिऊन भांडण करतो कारण दारु  साठी पैसे दे, नाहीतर घरातील रेशन तांदुळ विकुन आम्हाला उपाशी पोटी ठेवतो, आमच्या मुलाबाळांना सुखाची एक घास खाऊ द्या, सरकार ने मोफत दिलेली तांदुळ दुकानदार नाही घेतले तर आमची अशी परिस्थिती होत नाही याची दखल कोणी का घेत नाहीत? मुलांना कपडे ,औषधे, शिक्षण खर्च घर भाडे, लाईट बिल इ.अनेक समस्या कसे  करायचे? असे अनेक मोठ मोठ्या प्रश्न महिला वर्गातून होत आहे. 

     असेही ऐकवण्यास येत आहे की " भाड मे जाए जनता, और अपना तो हर रोज जमता " असे अवैध धंदे वाले म्हणतात.आमदार खासदार पासुन ते उच्च अधिकारी पर्यंत धागेदोरे असल्याची मोठी चर्चा निवडणुकी अगोदर व निवडणुकी नंतर ही जोरदार चर्चा सुरू आहे. 

       तरी या संपुर्ण प्रकाराकडे सर्व प्रशासन व महासंचालक साहेबांनी गांभीर्याने लक्ष देऊन दुधनीतील अवैद्य रेशन तांदुळाची तस्करी व ( आयात- निर्यात) लवकरात लवकर बंद करुन गरीब लोकांना एकवेळची सुखाची घास तोंडात पडावं अशी रास्त स्वरुपाची मागणी दुधनी व दुधनी परिसरातील जनतेकडून होत आहे.