Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

स्वराज्य माहिती अधिकार संघटनेच्या सहभागीमुळे मतदानात वाढ - सुशांत बनसोडे

Responsive Ad Here

स्वराज्य माहिती अधिकार संघटनेच्या सहभागीमुळे मतदानात वाढ - सुशांत बनसोडे 





अक्कलकोट/ प्रतिनिधी 

   अक्कलकोट विधानसभा निवडणुकीत यावेळी 66% टक्के मतदान झाले असून गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा 11% टक्के मतदानात वाढ  झाली आहे, यात प्रशासना समवेत "अक्कलकोट स्वराज्य माहिती अधिकार संघटनेने केलेले मतदार जनजागृती चे उत्कृष्ठ कार्य ही वाखान्याजोगे आहे हे राष्ट्रीय कार्य असून अनुकरनीय आहे " असे गौ्रोउदगार अक्कलकोट निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत बनसोडे व तहसीलदार विनायक मगर यांनी काढले आहे.

    अक्कलकोट मतदार संघात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 55%मतदान झाले आहे तर नुकतेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत 48% मतदान झाले आहे, काल पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा रेकॉर्ड ब्रेक असे 66% टक्के मतदान झाले आहे.

     निवडणूक आयोगाचे अधिकाऱ्यांनी घेतलेले कष्ट व नियोजन, उमेदवाराचा चूरशीचा प्रचार आणि हजारो निवडणूक कर्मचाऱ्यांनी केलेले मेहनत, अनेक मतदान केंद्रावरील मंडप, शेल्फी पॉईंट, चोख पोलीस बंदोबस्त या मुळे मतदानाचा टक्का वाढण्यात मदत् झाली.

    याच बरोबर अक्कलकोट स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेने शहरातील सात प्रमुख चौकात मतदार जनजागृतीचे लावलेले भव्य डिजिटल बॅनर्स मतदाराचे लक्ष वेधून घेत होते, तसेच मतदाना दिवशी बुधवारी दिवसभर ऑटोरिक्षावर स्पीकर लावून अनोख्या पद्धतीने केलेलं मतदान जागृतचे  अलाऊन्समेन्टचे कार्य मतदारांना भावल्याने मतदान टक्क्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.            स्वराज्य संघटना स्वखर्चाने सदर कार्य केल्याने प्रशासनाने समाधान व्यक्त करत अक्कलकोट स्वराज्य माहिती अधिकार संघटनेचे कौतुक केले आहे. 

    स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार  संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष मा.दीपकजी कांबळे, संस्थापक महा सचिव मा.कमलेशजी शेवाळे देवा सर, प्रदेश अध्यक्ष सौ. धनश्री उत्पात यांचे आदेशानुसार व विश्वस्त तथा राज्य प्रसिद्धी प्रमुख मा.उमेशजी काशीकर, व सोलापूर जिल्हा अध्यक्ष मा. दिनेशजी काटकर यांचे मार्गदर्शनाखाली अक्कलकोट विधानसभा निवडणुकीत मतदार जनजागृतीचे अनोखा राष्ट्रीय कार्यक्रम  स्वराज्य चे तालुका अध्यक्ष चंद्रकांत दादा वेदपाठक यांनी आपल्या सहकारी पदाधिकाऱ्या समवेत यशस्वी पणे राबवली.

   यामध्ये तालुका उपाध्यक्ष दीपक पोतदार,उपाध्यक्ष गौरीशंकर चनशेट्टी, कार्याध्यक्ष दयानंद बिडवे, सचिव सौ. वर्षाताई चव्हाण, काशिनाथ पोतदार, पंकज कोरेकर, बलभीम पवार, शिवलिंगप्पा संगापुरे, अप्पासाहेब धुमाळ, श्रीमती मीराबाई बुद्रुक सह अनेक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.