प्रा. लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ला करणार्यांवर तात्काळ कारवाई करा- काशीनाथ पोतदार
सोलापूर- ओबीसी हक्क परिषदेचे वरिष्ठ नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या वर भ्याड हल्ला करणार्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावे असे निवेदन जिल्हाधिकारी यांना ओबीसी हक्क परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश संघटक काशीनाथ पोतदार यांनी दिले आहे.
निवडणुकीच्या तोंडावर नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील बाचोटी गावातील मराठा समाजाचे गाव गुंडानी प्रा. हाके यांच्या वर भ्याड हल्ला केला आहे. दि. 7 नोव्हेंबर रोजी बाचोटी गावात निवडणुक प्रचारासाठी प्रा. हाके फिरत असताना मराठा समाजाच्या गाव गुंडानी हाके यांच्या गाडीवर दगडफेक करुन भ्याड हल्ला केला आहे.
ओबीसी मध्ये संस्कार, धैर्य, शांतता, साहस व संयम आहे, माञ मराठा समाज कोणत्याही नियमात नबसणारी मागणी शासनाकडे करीत असुन त्यांच्या कडे दंडेलशाही, गुंडगिरी, हुकुमशाही दिसत आहे हे योग्य नाही. मराठा समाजाच्या मागणी विरुद्ध आम्ही नाही माञ ओबीसी मधुन आरक्षण काढुन मराठ्यांना देण्यात येऊ नये एवढेच आमचं म्हणणं आहे. प्रा. लक्ष्मण हाके यांच्या वर हल्ला करणार्यांवर तात्काळ प्रशासनाने कारवाई करावी अन्यथा आम्हाला सुद्धा जशास तसे उत्तर देता येते असे ओबीसी हक्क परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश संघटक काशीनाथ पोतदार यांनी निवेदनात म्हटले आहे.
यावेळी सौ. माधवीताई पोतदार, संतोष सुतार, प्रकाश कटारे, सुरेशसिंह परिहार, बाळु पोतदार, रामचंद्र पोतदार, सौ. मनिषा पंडित, सौ. माधुरी डहाळे, यशवंत कोळी, शिवा भरले आदी उपस्थित होते.